लोकसभा निवडणुकीत गाजणार ‘हे’ सहा मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्य़क्रम जाहीर केला. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकाचे औपचारिक बिगूल वाजेले आहे. यावेळी लोकसभा निडणुकीत नरेंद्र मेदींच्या नेतृत्वाखाली भाजपा विरुद्ध इतर विरोधी पक्ष अशीच मुख्य लढत रंगणार आहे. नरेंद्र मोदींना विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यावरुन घेरण्याची तयारी केली आहे. या निवडणूकीमध्ये राफेल पासून ते पुलवामा पर्य़ंतचे सर्व मुद्ये गाजणार आहेत. येत्या सव्वा दोन महिन्यांच्या काळात हे मुद्दे लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा ठरवतील अशी शक्यता आहे.

१७ व्या लोकसभा निवडणुकीत गाजणारे मुद्दे

१. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशासतसे उत्तर दिले असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर पुलवामा हल्ल्यावरुन काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरत आहेत. तसेच जवानांच्या शौर्याचा गैरवापर मोदींकडून होत असल्याचा आरोप देखील काँग्रेसकडून होत आहे. तसेच राफेल विमान करारवरुन मोदींना धारेवर धरण्यात येत आहे.

२. शेतकऱ्यांचे प्रश्न

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांच्या जोरावर भाजपा सरकार सत्तेत आले. भाजपाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केल्याचा भाजपाकडून प्रचार करण्यात येत आहे. मात्र, मागील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीच कामे झाले नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरु शकतो.

३. रोजगार

घटलेला रोजगार आणि वाढती बेरोजगारीच्या संखेवरुन विरोधक मोदींना घेरण्याच्या तयारीत आहेत. रोजगार हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेरोजगारी वाढल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे या मुद्यावर काँग्रेसने भाजपची कोंडी केली आहे.

४. घराणेशाही विरुद्ध योजना

घराणेशाहीवरुन भाजपाकडून काँग्रेसला सातत्याने लक्ष केले आहे. त्यातच प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्याने भाजपाकडून घराणेशाहीचा आरोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. याला काँग्रेसकडून जोरदार प्रतिकार केला जात आहे. विविध योजनांमध्ये आलेले अपयश, अंमलबजावणीमधील अपयश यावरुन सरकारला घेरण्यात येत आहे. मेक इन इंडिया, शेतकरी, दलित, महिला सुरक्षा या मुद्यांमवरुन सरकारला आलेले अपयशांचा पाढा काँग्रेसकडून वाचण्यात येत आहे.

५. जात

भारतात आत्तापर्य़त झालेल्या निवडणुकीत जात आणि धर्म हे महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दलितांवर अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप काँग्रेसकडून होत आहे.त्यासाठी उना, रोहित वेमुला प्रकरण, भारत बंद दरम्यान झालेला हिंसाचार यांचे उदाहरण दिले जात आहे. तर भाजपाकडून आर्थिक निकषावर देण्यात आलेला आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. या निर्णयामुळे सवर्ण मतदार आपल्याकडे आकर्षित होईल, असा भाजपाला विश्वास आहे.

६. राम मंदिर

१९९० नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. प्रत्येकजण राम मुद्यावरुन सरकरकारला धारेवर धरत आहेत. राम मंदिराच्या मुद्यावर काही अश्वासक अशी कामगिरी भाजपाला करता आली नाही. दरम्यान, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून तो सोडवण्यासाठी आता मध्यस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह, विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदू संघटना या मुद्यावर आक्रमक झाल्या आहेत. तर काँग्रेसही आपल्या खांद्यावरली सेक्युलॅरिझमची धुरा सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे.

ह्याहि बातम्या वाचा

मनमोहन सिंग पंजाबमधून लोकसभा लढवणार ?

पार्थ पवारांचे ठरले, पण रोहित पवारांचे काय ? ; शरद पवारांनी केलं स्पष्ट

इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

शरद पवारांना आपला पराभव दिसला म्हणून त्यांनी माघार घेतली