राफेल घोटाळ्याचे रहस्य पर्रीकऱ्यांच्या बेडरूममध्ये : काँग्रेस 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल लढावू विमान खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला आता घेरण्याची नवीन पध्द्त शोधून काढली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर हि काँग्रेसने हा मुद्दा रेटण्यास आणखी जोरात सुरु केली आहे. राफेर घोटाळ्याचे रहस्य पर्रीकरांच्या बेडरूम मध्ये दडलेले आहे असा निशाणा काँग्रेसने भाजपवर साधत या मुद्द्याला नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. राफेल घोटाळ्या बाबत पर्रीकरांच्या जवळ खूप मोठी माहिती आहे. त्यांनी ती माहिती बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बरीच विषय स्पष्ट होणार आहेत असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हणले असून त्यांनी चोकीदार चोर हे या त्यांच्या ब्रीद वाक्याचा  पुनरूच्चार केला आहे.

गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांच्या संभाषणाची ध्वनी फित सादर करत याच ध्वनी फितीचा आधार घेत त्यांनी पर्रीकरांच्या बेडरूम मध्ये राफेल घोटाळ्याच्या फायली असल्याची माहिती या ध्वनी फितीतून राणे देत असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला आहे. त्याच प्रमाणे हि ध्वनी फित कधीची आहे या बद्दल सुरजेवाला यांनी कसलीही माहिती दिली नाही.

माझ्या घरी राफेल घोटाळ्या बाबत कागदपत्रे आहेत त्यात या घोटाळ्याची माहिती दडलेली आहे असे या ध्वनी फितीमध्ये पर्रीकर बोलत असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला आहे.  तर पर्रीकरांच्या जवळ या घोटाळ्याची बरीच माहिती आहे त्यांनी ती जाहीर केलीच पाहिजे असे सुरजेवाला यांनी म्हणले आहे.

मोदी एकटेच फ्रान्स आणि पॅरिसला गेले होते. त्यांच्या सोबत त्यांच्या शिष्टमंडळात अनिल अंबानी होते. तर तेव्हाचे आपले संरक्षण मंत्री गोव्यात मासे खरेदी करत होते असा घणाघात सुरजेवाला यांनी केला असून त्याच बरोबर त्यांनी पर्रीकरांनी या बाबत माहिती दिली पाहिजे असे ते म्हणले आहेत. नरेंद्र मोदी संयुक्त संसदीय समिती पासून दूर पळत आहेत. त्यांनी समितीला राफेल करारा बाबत कोणतीच कागदपत्रे दाखवली नाहीत असे ही सुरजेवाला म्हणाले आहेत.