Ranveer Singh And Alia Bhatt | “झुमके मला दे, तुझी वहिनी खूष होईल”; दीपिकासाठी रणवीरने केली आलियाच्या झुमक्यांची मागणी…

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री आलिया भट्ट (Ranveer Singh And Alia Bhatt) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणवीर व आलिया यांना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार असून चाहते यासाठी उत्सुक आहेत. रणवीर व आलिया दोघेही सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान एका चाहत्याने आलियाला झुमका गिफ्ट केला तर तो झुमका रणवीरने दीपिकासाठी मागितला. रणवीर व आलियाचा (Ranveer Singh And Alia Bhatt) हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट ही बाळाला जन्म दिल्यानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या माध्यामातून पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा करण जोहर (Karan Johar) देखील 6 वर्षांनंतर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. गाण्यांना देखील उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यामधील एक गाणे ‘व्हॉट झुमका’ (What Jhumka Song) हे गाणे सध्या सर्वत्र गाजत आहे. हे गाणे तरुणांच्या तोंडावर सतत ऐकायला मिळत आहे. हे ‘व्हॉट झुमका’ गाणे ‘मेरा साया’मधील ‘झुमका गिरा रे’ (‘umka Gira Re) या सुपरहिट गाण्याचा रिमेक आहे. ‘झुमका गिरा रे’ हे अजरामर गाणे आशा भोसले (Asha Bhosle) यांनी गायले होते आताचे हे नवे गाणे अरजित सिंगने (Arjit Singh) गायलेले आहे.

आलिया भट्ट व रणवीर सिंग त्यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. दिल्लीच्या एका प्रमोशन दरम्यान आलियाला तिच्या एका चाहत्याकडून खास गिफ्ट देण्यात आले. तिचा हा चाहता आलियासाठी खास कानातले घेऊन पोहोचला. चाहत्याने आलियाला हे कानातले भेट देताच रणवीर देखील त्याच्याकडे या कानातल्यांची मागणी केली. आलियाला गिफ्ट दिल्यानंतर रणवीर चाहत्याला विचारतो की तुला तिच्याकडून काय हवं आहे? त्यावर चाहतो म्हणतो की फक्त एक मिठी. यावर रणवीरनेही मजेशीर उत्तर दिले.

रणवीर सिंग चाहत्याला म्हणाला की, ‘तू आलिया भट्टला मिठी मार आणि हे कानातले मला दे.
तुझ्या वहिनीला खूप आनंद होईल.’ हे ऐकून कार्यक्रमात एकच हशा पिकला.
रणवीर-आलियाचा (Ranveer Singh And Alia Bhatt) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘रॉकी आणि राणी की प्रेम कहानी’ चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये रणवीर व आलियाचा रोमांस पाहण्याची संधी मिळणार आहे.
यामध्ये अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra), शबाना आझमी (Shabana Azmi) आणि जया बच्चन (Jaya Bachchan)
हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.

ACB Trap News | 30 हजार रुपये लाच घेताना वैधमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Monsoon Session | ‘आईच्या पोटी कोणी…’, विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप