नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतचे ‘सुवर्ण’ यश

मुंबई : वृत्तसंस्था – जर्मनी येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतने भाराताचा तिरंगा फडकावला आहे. राहीने २५ मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सुवर्णपदकासह तीने टोकिओ येथे होणा-या ऑलंम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली आहे. राही सरनोबतच्या या यशामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

जर्मनीच्या म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारताचा युवा नेमबाज सौरभ तिवारी यानेही धडाकेबाज कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण पदक पटकावले. याचबरोबर मेरठच्या चौधरीने नवी दिल्ली येथे विश्वचषकातील स्वत: केलेल्या २४५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये रशियाच्या आर्तम चेरसुनोवने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्यपदक जिकले.

महाराष्ट्राची स्टार नेमबाज राही सरनोबतने पुढील वर्षी होणा-या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवताना म्यूनिच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. २५ मीटर पिस्तूलमध्ये सहज वर्चस राखताना राहीने बाजी मारली. अंतिम फेरीत आपला दबदबा राखताना राहीने एकूण ३७ निशाने साधले. याआधी २०१३ साली चांगवन विश्वचषक स्पर्धेतही राहीने सुवर्ण जिंकले होते.