टीम इंडियामध्ये भावांची चौथी जोडी, एका भावाला धोनीकडून ‘प्रशिक्षण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघात नवीन दोन चेहरे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातून आनंद व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय संघाची निवड करताना लेग स्पिनर राहुल चाहरला वेस्टइंडिज च्या विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी निवड केली आहे. राहुल टी-२० सिरीजच्या तिन्ही सामन्यात खेळणार आहे. तर राहुलचा भाऊ दीपक चाहर याचीही भारतीय संघात निवड झाली आहे. त्यावरून राहुलच्या वडिलांनी सांगितले की, राहुलची भारतीय संघात निवड झाली ही आमच्यासाठी खूप आनंदाची वार्ता आहे. तसंच महेंद्र सिंह धोनीचे आभार मानत त्याने राहुलला कशी मदत केली हेही त्यांनी यावेळी सांगितलं.

कॅप्टनकुल महेंद्र सिंह धोनीने २०१७च्या राइजिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खेळत होता. तेव्हा त्याने राहुलची खूप मदत केली आहे. राहुलनेच मला सांगितले की, धोनीसरांनी पुण्याकडून खेळताना माझी खूप मदत केली. ते माझ्या मुलाची मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दीपक चाहर आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईकडून खेळत आहे. प्रत्येक मुल जो चेंडू किंवा बॅट उचलतो तो भारतीय संघात भारतासाठी खेळू इच्छित असतो. तशीच आमची दोन्ही मुलं भारतीय संघात आहेत. या हून अधिक आनंदाची बातमी काय होऊ शकते. राहुलची भारतीय संघासाठी निवड झाली तेव्हा आम्हाला पूर्ण रात्र झोप नाही लागली, असंही त्यांनी सांगितलं. संघातील बाकीच्यांसारखे त्यांनीही ट्रायल दिले होते. मात्र त्यांची निवड झाली नाही. तसंच मुंबई ट्रायल सुरु होते ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. तेव्हा त्यांनी त्यांची प्रतिभा सर्वांना दाखवत मुंबई इंडियन्सच्या संघात निवड झाली, असंही त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, राहुल आणि दीपक चुलत भाऊ आहेत. दीपक त्यांच्यात मोठा असून राहूलने दीपकला पाहून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. आता राहुल आणि दीपकची निवड भारतीय संघात झाली आहे. त्यामुळे भारतीय संघात एकत्र खेळणाऱ्या भावांची ही चौथी जोडी आहे. मोहिंद्र अमरनाथ आणि सुरिंद्र अमरनाथ, इरफान पठान आणि यूसुफ पठान, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या या तीन जोड्या भारतीय संघात खेळले आहेत. तर आता दीपक आणि राहुल ही चौथी जोडी असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –