Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?

सूरत : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते (Congress Leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत न्यायालयाने (Surat Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सूरत कोर्टात मोदी आडनावावरून (Modi Surname) झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात (Surat Sessions Court) याचिका दाखल केली आहे.

पहिला अर्ज हा शिक्षेला स्थगितीसाठी होता. हा नियमित जामीन अर्ज आहे, तर दुसरा अर्ज हा शिक्षेला स्थगितीचा होता. राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पहिला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. राहुल गांधींच्या दुसऱ्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी (MP) मिळू शकते. परंतु यासाठी काही वेळ लागू शकतो. सूरत न्यायालयात राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बहिण प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.

अवमान याचिका प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी सूरत कोर्टात सोमवारी पोहचले. त्यांच्या याचिकेवर सुनावणीनंतर 13 एप्रिलपर्यंत जामीनाची मुदत वाढवण्यात आली आहे. याशिवाय शिक्षेविरोधातील याचिकेवर 3 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. जर शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली तर राहुल गांधी यांना पुन्हा लोकसभा सदस्यत्व (Lok Sabha Membership) मिळू शकते.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत (Kolar Election Rally)
वादग्रस्त विधान केले होते. नीरव मोदी (Nirav Modi), ललित मोदी (Lalit Modi),
नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात?
या विधानासंदर्भात भाजप आमदार पूर्णेश मोदी (BJP MLA Purnesh Modi) यांनी राहुल गांधी यांच्यावर
सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे,
असे म्हणत राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी तक्रारीत केला होता.
या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर
लगेच जामीन दिला होता.

Web Title :-   Rahul Gandhi | congress leader gets bail next hearing on 13 april

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Arvind Sawant | ‘रिक्षावाला’ शब्दावरुन अरविंद सावंत यांचा यु-टर्न, म्हणाले – ‘तो शब्द शरद पवारांचा नाही, तो शब्द…’

 

Maharashtra Politics News | ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये जाणार’, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट