Video : जेव्हा राहूल गांधींनी समुद्रात मारली डुबकी, व्हिडीओ होतोय व्हायरल

कोल्लम : वृत्तसंस्था – काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मच्छिमारांचे जीवन जवळून पाहणे आणि समजण्यासाठी त्यांच्यासह नावेत बसून समुद्रात गेले. जेव्हा मासे पकडण्यासाठी जाळे टाकले तेव्हा राहुल गांधींनीही मच्छिमारांसोबत समुद्रात उडी मारली. समुद्र तटाजवळ जाण्यापूर्वी राहुल गांधी सुमारे 10 मिनिटे समुद्रात तरंगत होते. त्यावेळी नावेत राहुल गांधींचा एक सिक्युरिटी ऑफिसरही होता.

समुद्रात नावेतून जाणाऱ्या मच्छिमारांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी समुद्रात उडी घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत एक काँग्रेस नेतेही होते. राहुल गांधी आम्हाला याची माहिती न देताच पाण्यात उतरले. आम्ही हे पाहिल्यानंतर आम्हाला काहीही समजले नाही. ते सुमारे 10 मिनिटांपर्यंत पाण्यात होते. राहुल गांधी एक चांगले स्वीमर आहेत, असे या नेत्याने सांगितले. राहुल गांधी यांनी निळा टी-शर्ट आणि खाकी पँट घालून समुद्रात उडी घेतली. थंगासेरी तटावर परतल्यानंतर राहुल गांधी यांनी ओले झालेले कपडे बदलले.

नावेत ब्रेड आणि फिश करी
राहुल गांधी यांच्यासोबत नावेत 23 मच्छिमारही होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल आणि टी. एन. प्रतापन यांच्यासह पक्षाचे चार नेतेही उपस्थित होते. मच्छिमारांनी राहुल गांधी यांना नावेत ब्रेड आणि फिश करी खाऊ घातली. राहुल गांधी सुमारे अडीच तास समुद्रात होते. त्यांनी मच्छिमारांनी बनवलेली फिश करीचा स्वाद घेतला.