Rahul Kalate | ठाकरेंना पुन्हा धक्का; राहुल कलाटे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Kalate | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Shivsena – UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad) राहुल कलाटे (Rahul Kalate) शिवसेनेत (शिंदे गट) (Shivsena Shinde Group) प्रवेश करणार असल्याचे समजते. या आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामील होणार आहेत.

राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आजच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande), डाॅ. नीलम गोऱ्हेंनी (Dr. Neelam Gorhe) शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री शिंदेंनी मोठी जबाबदारी सोपवली. त्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आता चिंचवडचे राहुल कलाटेही ठाकरे गटाची साथ सोडत असल्याचे समजते.

कोण आहेत राहुल कलाटे?

कलाटे कुटुंबीय 2001 पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2002 साली राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले. 2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 2017 मध्ये प्रथम शिवसेनेकडून नगरसेवक झाले. महापालिकेत शिवसेनेचे गटनेते, तसेच शहराध्यक्ष होते. 2019 विधानसभेवेळी युती असताना बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळाला. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांविरोधात निवडणूक लढली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोट निवडणुकीवेळी मविआमधून बंडखोरी केली. मात्र यावेळी कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

Web Title :  Rahul Kalate | rahul kalate will join eknath shinde shiv sena chinchwad constituency uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Mangala Narlikar Passed Away | डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितीतज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

Pune Gold Rate Today | आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

Today Horoscope | 17 July Rashifal : मेष आणि वृषभसह या 5 राशीवाल्यांना मिळेल भाग्याची साथ, वाचा दैनिक राशिफळ