…म्हणून पिंपरी महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटेंनी दिला राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी मंगळवारी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचा आदेश आल्याने मी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असे माहिती राहुल कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राहुल कलाटे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. राहुल कलाटे हे प्रभाग क्रमांक २५ वाकड, माळवाडी, पुनावळे, पंढारेवस्ती, भुजबळ, भूमकरवस्ती या प्रभागातून निवडून आले होते.

राहुल कलाटे यांनी शहरप्रमुखपदी काम केले आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीत निवडून आल्यावर त्यांची शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली होती. त्यांनी २ वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद देखील भूषविले होते. राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात निवडणूक देखील लढावली होती. त्यामध्ये त्यांना १ लाख १२ हजार मते भेटली होती.