Aditya Thackeray | ‘त्यादिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि…’, आदित्य ठाकरेंचा थेट इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मनपाच्या मुख्यालयावर (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ठाकरे गटाने (Thackeray Group) मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करत आहे. यावेळी मोर्चाला संबोधित करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. खोके सरकारकडून मुंबई ताब्यात घेण्यासाठी माजी नगरसेवक फोडले जात आहेत. यासाठी आता आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांकडून फोन केले जात आहेत. याचे काही रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत. लवकरच ते उघड करेन, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला.

त्यादिवशी पोलीस आणि आम्ही…

पहिला घोटाळा म्हणजे रस्त्यांचा घोटाळा (Road Scam) होता. तो सगळ्यांना समजला पाहिजे. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्या पैशांचा गैरवापर झाला आहे. तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का असं मला विचारतात. मी म्हणतो चोरांना काय निवेदन द्यायचे. तुम्ही जी चोरी केलीय ती आमच्या नजरेत आलीय, ज्या दिवशी आमचे सरकार आले त्या दिवशी पोलीस आणि आम्ही आत घुसणार आणि अटक करणार, लक्षात ठेवा, असा थेट इशारा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिला.

40 टक्के कमिशन खाल्लं

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार असल्याचं खोके सरकारने सांगितले. एखादा रस्ता खोदायला गेला किंवा तयार करायला गेला तर एकूण 42 प्रतिक्रियातून काम केलं जातं. वाहतूक पोलिसांनाही विचारावं लागतं, तसेच राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या 16 एजन्सी आहेत, त्यांना विचारावं लागतं. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईत 400 किमीचे रस्ते तयार करणार. मुंबईतील रस्त्यांची काम सुरु करायच्या आधीच कॉन्ट्रॅक्टरला 600 कोटी रुपये देण्याची तयारी असलेल्या खोके सरकारने मुंबईत्या रस्त्यात घोटाळा करुन 40 टक्के कमिशन खाल्ल, असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

Web Title : Aditya Thackeray | shivsena aditya thackeray mumbai bmc morcha on road corruption slams eknath shinde bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्