Rahul Narvekar On Aaditya Thackeray | ‘त्यांच्या गिधड धमक्यांना अध्यक्ष घाबरत नाहीत’, राहुल नार्वेकरांचे आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Narvekar On Aaditya Thackeray | आमदार अपात्रेच्या प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Group) केला जात आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांच्या परदेश दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांचा दौरा रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्यामुळे अध्यक्षांनी विदेश दौरा रद्द केल्याचे म्हटले होते. यावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar On Aaditya Thackeray) यांनी पहिल्यांदाच सविस्तर सांगितले.

राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्र प्रकरणी निर्णय कायद्याच्या चौकटीतच राहून घेतला जाईल. आपल्या निर्णय प्रक्रियेवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. अनेक माध्यमातून, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यापूर्वीही सांगितलं आहे की, मी माझा निर्णय संविधानातील तरतूदींच्या आधारावर घेणार आहे. कोणीही मला प्रभावित करणयाचा प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारचे आरोप केले, तरीही मी त्यातून कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच मी काम करणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या गिधड धमक्यांना घाबरत नाही

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या परदेश दौऱ्याबाबत ट्विट केलं होतं. त्यासंदर्भातही आज राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, माझा परदेश दौरा मी 26 सप्टेंबरलाच रद्द केला. माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही, असं 26 तारखेलाच सीपीए ला कळवलं होतं. मात्र 28 तारखेला उगाच त्या दौऱ्याबाबत मोठी चर्चा घडवून, त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावल्याचा केविलपणा प्रकार काही नेत्यांनी केला. पण त्यांचा हा प्रयत्न आहे की, कसंही करुन अध्यक्षांवर दबाव आणायचा. पण अध्यक्ष त्यांच्या या गिधड धमक्यांना घाबरत नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होत नाही, त्यामुळे नियमांनुसारच काम होणार असल्याचे स्पष्ट केलं. (Rahul Narvekar On Aaditya Thackeray)

इतर आमदारांसारखं मी काम करत नाही

माझ्या मतदारसंघात मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधान परिषदेच्या आमदारांकडून चालवत नाही.
मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरून काम करतो. आजही दिवसातील चार तास मी माझ्या मतदारसंघाच्या
कार्यालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवतो. त्यामुळे ज्यांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनीधींमार्फत
चालवण्याची सवय आहे. त्यांना हे समजणारच नाही, लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे.
त्यामुळे यावर भाष्य करण्यीच गरज नसल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Crisis | निवडणूक आयोगाने एकांगी निर्णय घेतला, शरद पवार गटाचा आरोप; पुढील सुनावणी ‘या’ तारखेला