Rahul Narvekar On NCP MLA Disqualification | अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ! शरद पवार गटाची अपात्रता याचिका नार्वेकरांनी फेटाळली!

मुंबई : Rahul Narvekar On NCP MLA Disqualification | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्यास सुरूवात केली असून त्यांनी शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिका फेटाळल्या. अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या आयोगाच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या अपात्रता याचिका नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत.(Rahul Narvekar On NCP MLA Disqualification)

निकाल देताना नार्वेकर काय म्हणाले…

  • अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांचे संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे.
  • अजित पवार गटाकडे मतांचा असलेला पाठिंबाही जास्त असल्याच्या स्थितीला शरद पवार गटाकडून आव्हान देण्यात आलेले नाही.
  • नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत २८ सदस्य आहेत. पण पक्षघटनेनुसार २५ सदस्यच असू शकतात.
  • राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार गटाला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण त्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे हा दावा मान्य करता येणार नाही.
  • दोन्ही बाजूंनी सादर केलेल्या युक्तिवादानंतर पक्षाध्यक्ष कोण आहे, यासंदर्भात मी कोणत्याही निश्चित अशा निर्णयापर्यंत येऊ शकलो नाही.
  • ३० जून २०२३ रोजी वाद झाला तेव्हा दोन व्यक्ती पक्षाध्यक्ष असल्याचा दावा करत असल्याचे समोर आले आहे. २९ जूनपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वावर कोणताही वाद नव्हता.
  • वादाच्या वेळी अध्यक्ष कोण होते? एवढाच माझा निर्णय घेण्याचा भाग आहे. त्या अध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने झाली होती की नाही, यावर मी निर्णय देणे अपेक्षित आहे.
  • ३० जून २०२३ रोजी अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. मात्र, शरद पवार गटाने हा दावा फेटाळला आहे. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे.

  • २०२२ मध्ये पक्षात झालेल्या अंतर्गत निवडणुकीबाबत पीतांबरम व प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती
    दिली होती. या कागदपत्रांच्या आधारे पक्षात वैध नेतृत्व होते असा दावा शरद पवार गटाकडून दाखल याचिकांमध्ये
    केला आहे.
  • पक्षाध्यक्ष व कार्यकारिणी समिती यांच्याकडे पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षघटनेनुसार देण्यात
    आले आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वोच्च संघटना ही कार्यकारिणी समिती आहे. पक्षघटनेच्या कलम २१ मध्ये कार्यकारिणी
    समितीला पक्षाने ठरवलेल्या दिशेनुसार धोरणांची अंमलबजावणी करण्याचे सर्व अधिकार आहेत.
  • पक्षघटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. सध्याची पक्षघटनाच नेतृत्व
    संरचना लक्षात घेण्यासाठी ग्राह्य धरली जाईल.
  • ३० जून रोजी अजित पवारांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
    शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला. त्यातून राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचे ३० जून रोजूच स्पष्ट झाले.
  • सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ
    गट यावरून यासंदर्भातला निर्णय घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल फिमध्ये अपहार, डी.वाय.पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर FIR

Supriya Sule On Paytm Scam | देशातील दुसरा सर्वांत मोठा भ्रष्टाचार पेटीएममध्ये, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोख्यांच्या तपासाची केली मागणी

पिंपरी : महिंद्रा कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR