Rahul Narvekar On Uddhav Thackeray | राहुल नार्वेकरांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, …त्यांनी ‘तो’ खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही

मुंबई : Rahul Narvekar On Uddhav Thackeray | आमदार अपात्रतेसंदर्भात (MLA Disqualified Case) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी जे आदेश दिले होते त्या आदेशाची प्रत मिळण्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. आता यावरून शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar On Uddhav Thackeray) यांच्यात जुंपली आहे. ठाकरेंच्या टीकेवर आता नार्वेकर यांनी पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर टीका करताना म्हटले होते की, राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी.

ठाकरे यांच्यावर पलटवार करताना नार्वेकर यांनी म्हटले की, ज्यावेळी मला या आदेशासंदर्भात विचारले गेले, तेव्हा माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती. ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा. आता उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल. विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे.

नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेणे हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी करावा. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर ती प्रत वेबसाईटवर अपलोड झाली. त्यानंतर ती मला मिळाली. त्यावरून अशा कमेंट्स केल्या जात आहेत. (Rahul Narvekar On Uddhav Thackeray)

नार्वेकरांनी म्हटले की, त्यांना जर आदेशाची प्रत इतरांपेक्षा आधी मिळाली असेल, तर त्यांनी तो खुलासा करावा.
हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, या शब्दांत राहुल नार्वेकर यांनी पलटवार केला.

न्यायालयाने कोणते आदेश दिले

आमदार सुनील प्रभू MLA Sunil Prabhu (सेना-ठाकरे गट – Thackeray group) आणि आमदार जयंत पाटील
MLA Jayant Patil (राष्ट्रवादी काँग्रेस-पवार गट – Pawar group) विरुद्ध विधानसभा अध्यक्ष या याचिकांवर
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील
न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे सुनावणी झाली.

राहुल नार्वेकर यांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देण्यासाठी मुदत मागितली होती.
मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत
आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश विधानसभा
अध्यक्षांना दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी चर्चेला यावे, मराठे संरक्षण देतील”

Maratha Reservation | पुण्यात अजित पवार आणि उदय सामंतांचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले