‘लहानपणी माझा रेप झाला होता’, ‘अर्जुन रेड्डी’च्या अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन रेड्डी सिनेमात विजय देवरकोंडाच्या मित्राची भूमिका साकारणारा राहुल रामकृष्णा यानं एक खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीसोबतच त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. राहुलं एकामागोमाग अनेक ट्विट करत सांगितलं आहे की, लहानपणी त्याचा रेप झाला होता. राहुलच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे.

राहुल आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, “लहानपणी माझा रेप झाला होता. मला नाही माहित मी याबाबत आणखी काय म्हणू शकतो. मला फक्त स्वत:ला ओळखायचं आहे. मला माहिती आहे आयुष्यात खूप एकटेपणा असतो. मी या घटनेला माझ्या आयुष्यातील एक ब्लॅक होल मानतो. मला याकडे जास्त लक्षही द्यायचं नाही.”

आणखी एका ट्विटमध्ये राहुल म्हणतो, “हे खूप वेदनादायी आणि क्रूर आहे. परंतु यामुळे आपण पीडित नाही बनत. तुम्ही एका डागासोबतच एक योद्धा बनता. मी माझ्यावर थोपलेल्या क्राईमला घेऊन जगत आहे. यात मला कधीच न्याय मिळणार नाही. आपल्या लोकांना चांगला माणूस व्हायला सांगा.”

राहुलच्या या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियदर्शीनं लिहिलं आहे की, “मी प्रयत्न केला तरीही मला कधी हे दु:ख कळणार नाही. मीही काही करू शकत नाही. एकच सांगतो की, मजबूत रहा. तुम्ही या घाणाीतून बाहेर आला आहात आणि याला चांगल्या प्रकारे हँडल केलं आहे. तुम्ही एक फायटर आहात.”

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर राहुलनं अला वैंकुटपुरम लो, ची ला साओ, भारत अने नेनू, शीशमहल, गीता गोविंदम आणि मिठाई यांसारखे अनेक सिनेमे केले आहेत. विजय देवरकोंडासोबत केलेल्या अर्जुन रेड्डी या सिनेमातून राहुलला खूप लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.

फेसबुक पेज लाईक करा –