हिंजवडी : दारूच्या अवैध विक्री प्रकरणी चायनिज सेंटर आणि हॉटेलवर छापा ! लाखोंचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   हिंजवडी येथील चायनीज सेंटर आणि हॉटेलवर दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी छापेमारी करत पोलिसांनी 1 लाख 27 हजार 906 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्ष पथकानं ही कारवाई केली आहे.

योगेश राघु वाडेकर (वय 32, रा. हिंजवडी) आणि प्रभाकर गाणीग (वय 32, रा. हिंजवडी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वाडेकर हा स्वरा चायनिज अँड तंदूर पॉईंट या चायनीज सेंटरचा चालक आहे. तर आरोपी गाणीग हा खुशबू कबाब करी अँड बिर्याणी रेस्टॉरंट या हॉटेलचा चालक आहे.

पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, सदर आरोपी हे चायनीज सेंटर आणि हॉटेलमध्ये अवैध दारूची विक्री करतात. यानुसार पोलिसांनी छापेमारी केली. यात रोख रक्कम आणि देशीविदेशी दारू तसंच बियरच्या बाटल्या असा एकूण 1 लाख 27 हजार 906 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.