आॅर्केस्ट्रा बारवर छापा, ६ बारबालांसह ४५ जण ताब्यात

ADV

भार्इंदर : पोलीसनामा ऑनलाईन- भार्इंदर पूर्वेच्या प्राईम या आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या अश्लिल नृत्य व  बीभत्स प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी टाकलेल्या धाडीत १० बारबालांसह बार चालक – मालक, कर्मचारी असे १८ जण तर १६ ग्राहक अशा एकूण ४५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बारमध्ये ६ बारबालांना कोंदट अशा गुप्त खोलीत लपवून ठेवले होते. बारचे चालक, मालक ललित राज पुरोहित, जगदिश शेट्टी, सुनील शेट्टी, महेश शेट्टी, जया ठाकुर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भार्इंदरच्या पूर्वेला रेल्वे फाटकाजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये प्राईम नावाचा आॅर्केट्रा बार आहे. या बारमध्ये अश्लिल व बीभत्स प्रकार चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मध्यरात्रीनंतर नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग, उपनिरीक्षक विजय टक्के व राठोड तसेच पोलीस पथकाने धाड टाकली. या धाडीत बारमध्ये चार बारबाला तोकड्या कपड्यात अश्लिल हावभाव करुन नाचत होत्या. तर पुरुष ग्राहक त्यांच्यावर नोटांची उधळण करत होते. पोलिसांनी या बारबालांसह बारचे कर्मचारी अशा १८ जणांना तर १६ ग्राहकांना अटक केली. बारमध्ये आणखी बारबाला असल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध घेतला असता अत्यंत कोंदट व गुप्त खोलीत ६ बारबालांना लपवून ठेवल्याचे आढळून आले.

ADV

जाहिरात