‘या’ पक्षाच्या आमदाराच्या घरावर आयकरचे छापे

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर आयकर विभागाने केली. या छाप्यात २. ५६ कोची रुपयांची रोकड त्यांच्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बाल्यान हे दिल्लीच्या उत्तमनगर येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते शुक्रवारी सायंकाळी द्वारका सेक्चर १२ मध्ये एका फ्लॅटमध्ये आले होते. ते एका प्रॉपर्टी डिलरचे  घर असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यावेळी आयकर विभागाचे अधिकारी तेथे आले होते. त्यांनी बाल्यान यांच्याकडील रोकड जप्त केली आहे. तर तृही रोकड प्रॉपर्टीच्या व्यवहाराकरता आणली असावी  असा अंदाज आहे. आयकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरु आहे.