Aurangabad News : बनावट मतदार कार्ड बनविण्याचं डिजिटल सेंटर, पोलिसांकडून पर्दाफाश करून केली दोघांना अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   एका ई-महासेवा केंद्रावर बनावट मतदार कार्ड तयार करून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असे बनावट मतदार कार्ड बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या गजानन कॉलनीतील डिजीटल केंद्र आणि ई-महासेवा केंद्रावर पुंडलिकनगर पोलीस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री छापा टाकण्यात आला. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हरीश धुराजी वाघमारे (वय,२२), नवनाथ भक्तदास शिंदे (वय,२६) अशी त्या अटक केलेल्यांची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार गजानन कॉलनीतील मातोश्री डिजीटल या दुकानात बनावट मतदार कार्ड तयार केले जाते, अशी माहिती खबऱ्याने पोलिसाना दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या दुकानावर बनावट ग्राहक पाठवून नवीन मतदार कार्ड तयार करुन देता का अशी विचारणा करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांचा पंटर ग्राहक बनून तेथे गेला. त्याने केलेल्या मागणीनुसार हरीश वाघमारे याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन माहिती मिळविली.

दरम्यान, त्या माहितीमध्ये मतदाराचे केवळ नाव आणि पत्ता, वय असते छायाचित्र नसते. यामुळे त्याने ग्राहकाचा नवीन पासपोर्ट साईज छायाचित्र घेऊन ओळखपत्र तयार केले. यावर निवडणूक विभागाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याची बनावट इलेक्ट्रॉनिक ॲटोमॅटीक सही चिकटवली. यानंतर या मतदार कार्डचे स्मार्ट कार्ड तयार करून देण्यासाठी त्याने त्याचा मित्र नवनाथ शिंदे याच्या महा ई सेवा केंद्राच्या ई मेल वर पाठविले. शिंदे हा मतदार कार्ड चे स्मार्ट कार्ड तयार करून देण्याचे काम करतो. तसेच पोलिसांनी ई-महासेवा केंद्रावर धाड टाकली .यानंतर पोलिसांनी तेथील साहित्य जप्त केले. तेथे संगणक,प्रिंटर असा सुमारे ३९ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.