रायगडमध्ये हायप्रोफाईल ‘रेव्ह पार्टी’चा पर्दाफाश, ‘नको त्या अवस्थेत’ बॉलिवूड अभिनेत्री, TV कलाकार

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड पोलिसांनी एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या समुद्रकिनारी असलेल्या एका अलिशान बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने बंगल्यावर छापा टाकून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर तेथून विदेशी मद्य, चरस, कोकेन आणि इतर ड्रग्ज मोठया प्रमाणावर जप्‍त केले आहे. पोलिसांनी अलिशान बंगल्यातून काही महिला आणि पुरूषांना ताब्यात देखील घेतले आहे अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेव्ह पार्टीत बॉलिवूडमधील प्रसिध्द असलेल्या अभिनेत्री तसेच टीव्ही अभिनेत्रींचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी बहुतांश जणांनी मद्य सेवन तसेच ड्रग्ज घेतलेले आहे. याशिवाय, पोलिसांनी अलिशान बंगल्यातून ड्रग्ज डिलर आणि त्याच्या साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे.

ज्या अलिशान बंगल्यावर छापा टाकण्यात आला तो बंगला प्रसिध्द उद्योगपतीचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आरोग्यविषयक बातम्या

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘ही’ आसने

सुंदर आणि लांबसडक केसासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’

Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणा-या विद्यापीठांची होणार चौकशी

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव