Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळगड येथे बचाव मोहिमेचा दुसरा दिवस; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Irshalwadi Landslide | रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड (Raigad Irshalwadi Landslide) कोसळली. मध्यरात्रीनंतर तिथे बचावकार्य (Rescue Work) सुरू झाले. गुरुवारी दिवसभर बचावकार्य सुरू होते. तेथे मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा आहे. अजूनही 50 ते 60 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याामुळे आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफने (NDRF) सकाळपासूनच बचावकार्याला सुरुवात केली आहे. आज दिवसभर बचावकार्य सुरू असण्याची शक्यता आहे.

जवळपास 96 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले असून 16 जणांचा त्या दुर्घेटनेमध्ये मृत्यू (Death) झाला आहे.
अद्याप घटनास्थळी 20 फुटांचा दगड-मातीचा ढिगारा (Raigad Irshalwadi Landslide) असून तो उपसण्याचे काम
कुदळ-फावड्याच्या साहाय्याने केले जात आहे. “वर चढून जाणे अडचणीचे ठरत आहे. जेसीबी, पोकलेन वर नेणे अशक्य आहे. सातत्याने पाऊस पडत आहे. आम्ही काम करतोय तिथे पुन्हा पाणी साचत असल्याचे बचाव पथकाने सांगितले. कामाचा एकेक मिनिट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हे बचावकार्य अजून किती वेळ चालेल हे सांगता येत नाही. कारण कुदळ-फावड्याने ढिगारा उपसला जात आहे. एनडीआरएफची 4 पथके (4 Squads Of NDRF) बचावकार्य करत आहेत. तिथे 20 फुटांचा ढिगारा आहे. तो तिथून हटवणे मुश्किल झाले आहे, असे एनडीआरएफकडून (NDRF) सांगितले.

कुठे आहे इर्शाळवाडी?

रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे.
साधारणपणे 48 कुटुंबांची (48 Family) ही वाडी असून त्यातील 25 ते 30 घरांवर दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी वसली आहे. मात्र, या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही.
त्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला (NDRF And Administration) जेसीबी किंवा पोकलेन (JCB Or Poklen)
घटना स्थळापर्यंत नेणे अशक्य झाले आहे. दोन तासांची पायपीट करून पायथ्यापासून घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य
होत आहे.

Pune Crime News | ‘नासा’ला द्रव्य विकण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मागितल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरात शिरुन मारहाण