Pune Crime News | ‘नासा’ला द्रव्य विकण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मागितल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरात शिरुन मारहाण

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वीज पडून त्याचे रुपांतर होऊन त्याचे मिळालेले द्रव्य नासाला (NASA) विकणार आहे, असे सांगून तो पैसे घेऊन गेला. त्यासाठी सातत्याने पैशांची मागणी केली. ते न दिल्याने व अगोदर दिलेले पैसे परत मागितल्याने एकाने ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरुन त्यांना मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

ADV

याप्रकरणी एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सतिश प्रकाश धुमाळ Satish Prakash Dhumal (वय ४४, रा. मॅजेस्टिक अ‍ॅक्वा सोसायटी, फुरसुंगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक त्या पतीसह राहतात. त्यांचा मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. त्यांच्या सोसायटीत राहणारा प्रकाश धुमाळ याचा पेट्रोल पंप (Petrol Pumps) व गॅस एजन्सी (Gas Agencies) आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एक दिवस सतिश धुमाळ हे त्यांच्या घरी आले. केरळ राज्यातील मुन्ना येथे वीज पडून त्याचे रुपांतर होऊन त्यांचे द्रव्य आम्हाला प्राप्त झाले आहे. आमचा १८ जणांचा ग्रुप आहे. आम्ही सगळे त्यावर काम करीत आहोत. ते आम्ही अमेरिकेतील नासाला विकणार आहोत. त्यातून आम्हाला ४० हजार कोटी मिळणार आहेत. त्यासाठी मला पैशांची गरज आहे, असे त्याने सांगितले. त्यांच्याकडून पैसे घेऊन गेला. फिर्यादी यांनी पैसे परत मागितल्यावर तो त्यांच्याशी हुज्जत घालत असतो. (Pune Crime News)

फिर्यादीच्या घरी ८ जानेवारी २०२३ रोजी सतीश धुमाळ, त्याची पत्नी वैशाली व मुलगा प्रथमेश हे तिघे आले.
धुमाळ याने त्यांच्याकडे अजून मैसे मागितले.
तेव्हा त्यांच्या पतीने पैसे देण्यास नकार दिला व आम्ही दिलेले पैसे परत कधी देणार असे विचारले.
त्यावर सतिश धुमाळ याने घरात शिरुन फिर्यादी व त्यांच्या पतीला मारहाण केली.
तुम्ही जर पैसे मागितले तर तुमचे काही एक खरे नाही, असे म्हणत धमकी देऊन शिवीगाळ केली.
त्यांनी त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून गेला.
या घटनेने एकटे राहणारे हे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य घाबरुन गेले होते.
शेवटी त्यांनी आता हिंमत करुन पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस हवालदार सकट तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Today Horoscope | 21 July Rashifal : मिथुन, सिंह आणि कुंभ राशीवाल्यांच्या प्रतिष्ठेत होईल वाढ,
जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Pune Crime News | दालचाचे पैसे मागितल्याने डोक्यात सळई घालून केले जखमी; गुंडाला पोलिसांनी केले जेरबंद