Raigad Shivrajyabhishek Sohala | आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता, राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याने व्यक्त केला संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Shivrajyabhishek Sohala | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं (Raigad Shivrajyabhishek Sohala) यंदाचे 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ले रायगडावरुन (Raigad Fort) तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर… निवडणुकांसाठी वाट्टेल ते केलं जातय, असे म्हणत शिवराज्यभिषेक आजच्या दिवशी झालाच नव्हता. कुणाच्या सुपीक डोक्यातून हा विचार बाहेर आला, असे म्हणत आव्हाड यांनी रायगडावर आज झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर (Raigad Shivrajyabhishek Sohala) संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/Awhadspeaks/status/1664562071374110720?s=20

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला.
इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे.
आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्यांनी माफी मागावी.
हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असे म्हटलं.
तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा.

Web Title : Raigad Shivrajyabhishek Sohala | shiva rajyabhishek had not taken place on this day jitendra awhad expressed his anger on shinde and fadanvis Chhatrapati Shivaji Maharaj Shivrajyabhishek Sohala 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mahavitaran News | चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने एमआयडीसीमध्ये (Chakan MIDC) भारनियमनाची शक्यता

Pune Politics News | शिरुरमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छूक, अजित पवार म्हणाले- ‘मग बिघडले कुठे?’

Richest Indian Actress | ‘या’ अभिनेत्री आहेत देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, कोट्यावधी रूपयांच्या मालकीण