Raigad Suspected Boat | रायगडमध्ये बोटीतून एके-47 आणि हत्यारे जप्त, दहशतवाद्यांचा कट उधळला ?; परिसरात हाय अलर्ट घोषित

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Suspected Boat | रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर (Harihareshwar Beach) पोलिसांनी एका संशयित बोटीतून (Raigad Suspected Boat) तीन एके-47 रायफल (AK-47 Rifle), काडतूस (Cartridges), कागदपत्रे जप्त (Documents Seized) केले आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी रायगडमध्ये हाय अलर्ट (High Alert) घोषित केला आहे. तसेच सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनूसार, गुरूवारी सकाळी रायगड पोलीस (Raigad Police) गस्त घालत असताना हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर ही संशयित बोट (Raigad Suspected Boat) आढळून आली. बोटीची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये तीन एके-47 रायफल, काडतूस, कागदपत्रे इत्यादी मिळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरू केले तसेच खबरदारी म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केला. बोटीवर कोणी संशयित व्यक्ती दिसले होते का याची चौकशी पोलीस स्थानिकांकडे करत आहेत. तसेच महाराष्ट्र एटीएसचे (Maharashtra ATS) एक पथक रायगडला पोहचले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी वस्तू व्यक्तीबाबत तातडीने पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असं आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (Collector Dr. Mahendra Kalyankar) यांनी केलं आहे.

 

विधानपरिषदेत उपस्थित केला मुद्दा

दरम्यान, अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी विधानपरिषदेत (Legislative Council) हा मुद्दा उपस्थित केला.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, गुरूवारी सकाळी ही बोट सापडली असून यामध्ये तीन एके-47, अनेक कागदपत्रे, 250 जिवंत काडतूसे सापडली आहेत.
रायगडच्या किनाऱ्यावर अशा प्रकारे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय गंभीर आहे.
या संपूर्ण घटनेची तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी (Raigad MP Sunil Tatkare) केली आहे.
1993 मध्येही समुद्र किनारी अशी बोट आढळून आली होती. त्यानंतर पुढे काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे.
त्यामुळे या बोटीचा तपास व्हायला हवा. राज्य आणि केंद्र सरकारनं यंत्रणांच्या माध्यमातून याचा तपास करायला हवा, असं तटकरे म्हणाले.

 

Web Title : –  Raigad Suspected Boat | ak47 and ammunition recovered from two suspicious boats in raigarh district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा