Jobs News : 10 वी पास तरुणांना सुवर्ण संधी, रेल्वेमध्ये विनापरीक्षा होतेय 1004 पदांची भरती

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) अप्रँटिसच्या पदांसाठीची प्रक्रिया जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये ( South-Western Railway) अप्रँटिसच्या सुमारे 1004 पदांसाठी ही भरती निघाली असून, दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय केवळ शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर केली जाणार आहे. याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 असून, rrchubli.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छूक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी मध्ये किमान 500 गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा डिप्लोमा असणे आवश्य आहे. तसेच 24 वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी यांच्यासाठी 100 रुपये एवढे शुल्क निर्धारित केले आहे. तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या एकूण 1004 पदांची भरती होणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित केली आहे. यात हुबळी 287 कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी 217 बंगळुरू डिव्हिजन 280, म्हैसूर डिव्हिजन 280, म्हैसूर डिव्हिजन 177, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर 43 अशी पदे भरली जाणार आहेत.