सावधान : रेल्वे नियमानुसार रूळ पायी ओलांडत असाल तर दंडासह तुरूंगवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने आपण बऱ्याचदा प्रवास करतो, परंतू रेल्वेचे अनेक नियम आपल्याला माहित नसतात आणि हेच नियम जर मोडले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा थेट तुरुंगातच जावे लागू शकते.

अनेकदा आपण काही मिनिट वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडत असतो. आतापर्यंत याकडे दुर्लक्ष होत होते परंतू जर आता तुम्ही रेल्वे रुळ ओलांडून या प्लॅटफार्मवरुन त्या प्लॅटफार्मवर जाताना दिसलात तर तुम्हाला आता दंडाचा भार सोसावा लागू शकतो किंवा थेट तुरुंगवास.

हे आहे आभियान –
रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी कायमच प्रयत्न केले जातात, देशभरात मोठ्या प्रमाणात फुटओवर ब्रिज आणि अंडर ब्रिड रोड बनवण्यात येत आहेत. जेणेकरुन लोक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडणार नाहीत. यासाठीच देशभरात मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात येत आहेत. त्यात रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना पकडण्यात येणार आहे.

६ महिन्याची शिक्षा, १००० रुपये दंड –
रेल्वे रुळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा आहे. रेल्वे अधिनियम कलम १४७ च्या अंतर्गत रेल्वेचे रुळ पार करण्याच्या गुन्हात व्यक्तींना पकडण्यात येते. असे करताना कोणही दिसल्यास त्या व्यक्तीला ६ महिन्यांपर्यंत शिक्षा मिळू शकते. त्याच बरोबर १००० रुपयांच्या दंड सोसावा लागतो.

देशात रेल्वे रुळ ओलांडताना अनेक लोकांचे मृत्यू होतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियान सुरु करुन रेल्वे रुळ न ओलांडण्यासाठी प्रेरित केले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ