RRB NTPC, RRC Group D : रेल्वेच्या 1 लाख 40 हजार पदांवर भरती, 15 डिसेंबरपासून परीक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) ने यापूर्वी अनेक भरती काढल्या होत्या, ज्यांच्या भरती परीक्षा 15 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. बोर्डाकडून वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या तारखांना परीक्षा आयोजित केल्या जातील. या परीक्षांद्वारे रेल्वेत सुमारे 1 लाख 40हजार 640 पदांवर भरती होईल.

कोणत्या पदाची केव्हा परिक्षा
रेल्वे भरती बोर्ड, स्टेनो व प्राध्यापक श्रेणीच्या 1663 पदांसाठी 15 ते 18 डिसेंबर दरम्यान परीक्षा आयोजित करेल. सांगितले जात आहे की, या पदांसाठी 1 लाख 3 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याशिवाय गार्ड, स्टेशन मास्तर, ऑफिस क्लर्क, कमर्शियल क्लर्क इत्यादीची 35208 पदांसाठी 28 डिसेंबरपासून पुढील वर्षी मार्चपर्यंत परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

अशाच प्रकारे ट्रॅक मेन्टनंस, पॉईंट्स मॅन इत्यादी 1 लाख 3 हजार 769 पदांसाठी 15 एप्रिल ते जून 2021 पर्यंत परीक्षा होतील. अशाप्रकारे रेल्वे भरती बोर्डाकडून एकुण 1 लाख 40 हजार 640 पदांसाठी काढण्यात आलेल्या भरतीसाठी 2 कोटी 44 लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे.