राज्यामध्ये येत्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मध्य महाराष्ट्रासह राज्यात पडत असलेल्या पावसाने दोन दिवस विश्रींती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता. बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुण्यातही दोन दिवस ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता. शहरात शनिवारी देखील पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दुपारी काही वेळ ऊन पडले होते.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2068eab-8dac-11e8-9c11-6790e45aed5e’]

पुढील चार दिवसांत वातावरण बदलणार असून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या २२ ते २४ जुलैदरम्यान संपूर्ण राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, तर पुण्यात काही सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.