Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

नवी दिल्ली : Raj Kundra Pornography Case | बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी केस (Raj Kundra Pornography Case) मध्ये शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) चा जबाब पोलिसांनी नोंदला आहे. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

द शर्लिन चोपडा अ‍ॅपचे शूट

शर्लिनने नुकताच राज कुंद्रावर जबरदस्तीने घरात घुसून किस (KISS) केल्याचा आरोप केला होता. आता शर्लिनने ट्विटरवर राज कुंद्रासोबतचे ‘द शर्लिन चोपडा अ‍ॅप (The Sherlyn Chopra App)’ च्या पहिल्या शूटचे छायाचित्र शेयर केले आहे.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 259 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) ने पोस्ट केलेल्या छायाचित्रात राज कुंद्रा (Raj Kundra) एका अन्य व्यक्तीसोबत दिसत आहे. तिने दावा केला आहे की हे छायाचित्र ‘द शर्लिन चोपडा’ अ‍ॅपच्या पहिल्या शूट प्रसंगीचे आहे.

 Sherlyn Chopra, Raj Kundra, Sherlyn Chopra tweet, Sherlyn Chopra shares old picture with Raj Kundra, Raj Kundra Case, Social Media, Viral News, शर्लिन चोपड़ा, राज कुंद्रा

माझ्यासाठी एक नवीन अनुभव

तिने छायाचित्रासोबत लिहिले आहे की – 29 मार्च 2019 चा दिवस होता. आर्म्सप्राइम द्वारे आयोजित ‘द शर्लिन चोपडा’ अ‍ॅपचे पहिले कन्टेन्ट शूट होणार होते. माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता, कारण अगोदर कधीही कोणत्याही अ‍ॅपशी संबंधीत नव्हते. अपेक्षा आणि उत्साहाचे वातावरण होते.

त्याने म्हटले शिल्पाला तुझे व्हिडिओ आवडतात

शर्लिनच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मुंबई क्राईम
ब्रँचसमोर जबाब नोंदवल्यानंतर शर्लिन चोपडाने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की, राज कुंद्राने तिला
हे म्हणत दिशाभूल केली होती की, शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओज आणि छायाचित्रे खुप आवडतात.

त्याने माझी दिशाभूल केली

शर्लिनने पुढे म्हटले की, राज माझा मेंटॉर होता. जे सुद्धा मी शूट करत आहे ते ग्लॅमरसाठी आहे, असे
सांगत त्याने माझी दिशाभूल केली होती.

राज म्हणाले, सेमी न्यूड आणि पॉर्न कॅज्युअल

शर्लिनने राज कुंद्रावर आरोप करत म्हटले होते की, त्याने मला विश्वास दिला होता की, सेमी न्यूड
आणि पॉर्न कॅज्युअल आहे. सर्वजण करतात तर तुलाही करायला पाहिजे. मला याबाबत काहीही माहिती नव्हते.

मला माहित नव्हते की कुठून सुरू करायचे आणि काय करायचे. कधीच विचार केला नव्हता की हे
सर्व केल्यावर स्कँडलमध्ये अडकू शकते आणि नंतर मला क्राईम ब्रँचसमोर जबाब द्यावा लागेल.

हे देखील वाचा

ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

Pune News | पुण्यातील विद्यार्थ्यांनी तयार केली भारतातील पहिली चालकरहित इलेक्ट्रिक कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Raj Kundra Pornography | sherlyn chopra shares old picture with raj kundra know what she said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update