Raj Thackeray | मुंबईतील बिल्डरने राज ठाकरेंना पाठवला माफीनामा, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : Raj Thackeray | मराठी असल्याने सोसायटीत गुजराती लोकांनी एका महिलेला घर नाकारल्याचे प्रकरण सध्या गाजत असताना आज पुन्हा एकदा मिलिअन्स एकर या बिल्डरने मारवाडी आणि गुजराती कुटुंबाना प्राधान्य अशी जाहिरात मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड पूर्व भागातील गृहप्रकल्पासाठी केल्याचे निदर्शनास आले. यावरून पुन्हा संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान या बिल्डरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फोन करून खडसावल्याने अखेर या सर्व जाहिराती मागे घेत बिल्डरने थेट राज ठाकरे यांना माफीपत्र पाठवले आहे. (Raj Thackeray)

मनसे रिपोर्ट या एक्स हँडलवरुन आज एक पोस्ट करून ही माहिती देण्यात आली. यामध्ये बिल्डरची मूळ जाहिरात आणि बिल्डरचा माफीनामा सोबत जोडण्यात आला आहे. सोबतच्या मजकुरात म्हटले आहे. (Raj Thackeray)

तात्काळ निकाल

माजलेल्या मिलियन्स एकर ने अखेर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागितली आहे.
घरं फक्त मारवाडी आणि गुजराती समाजाला दिली जातील अशी जाहिरात करणाऱ्या ह्या मिलियन्स एकर ने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे कॉल जाताच माघार घेतलीय.
आपल्याकडे म्हटलं जातं एक कॉल, मॅटर सॉल्व्ह…अगदी असच काहीस, मनसेचे मावळे सतत परप्रांतीय आक्रमण विरोधात उभे राहतात.

बिल्डरने माफीनाम्यात लिहिलेय…

राज ठाकरे,
आम्ही टीम मिलियन्स एकर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही गुजराती आणि मारवाडी कुटुंबांसाठी प्राधान्य या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या पोस्ट आणि जाहिरातीची पूर्णपणे जबाबदारी घेतो. ती केवळ गुजराती आणि मारवाडी कुटुंबांना आकर्षित करण्यासाठी लिहिण्यात आली होती. त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. आम्हाला सचिन पोकळे यांचा फोन आला आणि संदीप राणे सरांच्या कार्यालयातून बाबू पाटील यांचा दुसरा कॉल आल्याने आम्ही चूक सुधारली आणि पुढच्याच क्षणी जाहिरात आणि पोस्ट हटवली. आम्हाला आमच्या कृतीबद्दल खेद वाटतो. कृपया आमच्या टीमतर्फे माफी स्वीकारा आणि भविष्यात असे पुन्हा होणार नाही याची आम्ही खात्री देतो.

  • हर्षित राजपूत, टीम मिलियन्स एकर

दरम्यान, मुंबईतील तृप्ती देवरूखकर या महिलेला मराठी असल्याने गुजराती लोकांनी सोसायटीत घर नाकारल्यानंतर
मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारात सोसायटीचा चेअरमन आणि सेक्रेटरीला माफी मागायला लावली होती.
यामुळे मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली. आता आणखी एक मिलियन बिल्डरचे असेच
प्रकरण मनसेने मार्गी लावत मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना