Raj Thackeray on Mahaarati | मनसेची राज्यभरातील महाआरती रद्द, राज ठाकरेंचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दोन सभा घेतल्यावर 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा आणि 3 तारखेला राज्यभर महाआरतीची (Raj Thackeray on Mahaarati) घोषणा केली होती. काल सभा झाली मात्र उद्याची महाआरती (Raj Thackeray on Mahaarati) रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वत: राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत माहिती दिली आहे.

 

पोस्टमध्ये काय म्हणाले राज ठाकरे ?
उद्या रमजान ईद (Ramadan Eid 2022) आहे, कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या (MNS Mahaarati) करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray on Mahaarati) म्हणाले आहेत.

 

याबाबत पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी सांगितली आहे. मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. महाआरतीला ‘विश्व हिंदू परिषद’ (Vishva Hindu Parishad) आणि ‘बजरंग दल’ (Bajrang Dal) यांच्याशी संलग्न असलेल्या आणखी आठ संघटनांनी पाठिंबा दिला होता.

 

दरम्यान, 3 तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही मात्र 4 मेपासून ऐकणार नाही.
ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असं राज ठाकरे म्हणाले होते.

 

Web Title :- Raj Thackeray on Mahaarati | mns chief raj thackeray mns s statewide aarti canceled raj thackeray says on facebook dont interfere in muslim festivals

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा