Raj Thackeray | ‘…तर जैन धर्माला नको असलेल्या गोष्टी तेथे घडतील’, राज ठाकरेंची झारखंड सरकारला विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Raj Thackeray | झारखंड येथील गिरीहीद हे जैन धर्मीयांचे पवित्रस्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय झारखंड सरकारने केला आहे. मात्र या निर्णयाला जैन धर्मीयांकडून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. याविरूध्द देशभरात जैन धर्मीयांनी आंदोलन पुकारले असून झारखंड सरकारने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी जैन संघटना करत आहेत. त्यावर मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासंबंधीचे ट्वीट त्यांनी केले असून त्यात झारखंड सरकारला हा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “झारखंडमधल्या गिरीहाद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मीयांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषीत झालं की तेथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत असून झारखंड सरकारने जैन धर्मीयांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास केंद्र सरकारने यात त्वरित हालचाल करावी”, असे देखील ते आपल्या ट्वीटमध्ये लिहतात.

नेमका काय आहे हा वाद?

झारखंडमधील गिरीहीद जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतावर असलेले जैन धर्मीयांचे पवित्रस्थळ
श्री सम्मेद शिखरस्थळाला इको-सेंसिटिव्ह झोन घोषित केला जावा,
अशी शिफारस राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती.
यावर केंद्र सरकारने २०१९ मध्ये या क्षेत्राला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर केले होते.
केंद्राच्या निर्णयानंतर आता झारखंड सरकारकडून हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पर्यटन स्थळाची घोषणा झाल्यानंतर याठिकाणी एका मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
जैन समाजाचे याबाबत असे म्हणणे आहे की, पर्यटन स्थळ जाहीर झाल्यामुळे येथील पावित्र्य भंग होईल.
ज्यांना जैन धर्माची आस्था नाही, ते लोकदेखील याठिकाणी येतील आणि मंदिराचे पर्यटन स्थळ होऊन जाईल.
मंदिराच्या ठिकाणी मांस-मद्य प्राशन केले जाईल, अशी भीती जैन समुदायामध्ये आहे.
त्यामुळे या मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळू नये अशी मागणी जैन समुदायाकडून होत आहे.

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray reaction on sammed shikharji row in jharkhand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गटबाजीचा पक्षाला फटका, कार्यकर्त्यांनी केली थेट शरद पवारांकडे तक्रार; केली ‘ही’ मागणी

Supriya Sule | सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या ‘राजकारणात सक्रिय महिलांबाबत…’

Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर