Raj Thackeray | मनसे-भाजपा-शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर राज ठाकरे यांनीच दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) आणि भाजपाची (BJP) जवळीक वाढली आहे. भाजपा नेत्यांनी यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. शिवाय, अलिकडेच मनसेच्या दिपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे एकत्र आले होते. यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे-भाजपा-शिंदे गट युती (MNS-BJP-Shinde Group Alliance) होण्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले होते. तशाप्रकारची चर्चाही सुरू झाली होती. या सर्व चर्चेवर आता स्वत: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, दीपोत्सवाचे उद्घाटन होते त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलावले मग यात काही गैर आहे का? उद्या मी फिल्म स्टारला बोलावले असते तर मग काय मी चित्रपट व्यवसायात जाणार? असा अर्थ होतो का.

वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) आणि टाटा एअरबससारखे (Tata Airbus) चार मोठे प्रकल्प लागोपाठ गुजरातला गेल्याने सध्या विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) घेरले आहे, तसेच महाराष्ट्रातील तरूण वर्गातही संताप व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदी सरकारच्या (Modi Government) या कृतीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, माझी पहिल्यापासूनची भाषणे काढून बघितलीत तर माझे मत हेच की, पंतप्रधान हे देशाचे हवेत. त्यांना प्रत्येक राज्य हे समान मुलांसारखे असले पाहिजे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट नसते वाटले. पण वाईट याचे वाटते की जो प्रकल्प येतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधानांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काही राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर अतिशय खालच्या दर्जाचे आरोप-प्रत्यारोप करत असल्याने सध्या
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब झाले आहे. याकडे राज ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,
सध्याचे राज्यातील राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. राजकीय नेत्यांची आरोप करतानाची भाषा अतिशय
खालच्या पातळीवर गेली आहे आणि हे दुर्दैव आहे. अशी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात मी याआधी कधीच पाहिली
नाही.

Web Title :- Raj Thackeray | raj thackerays comment on bjp shinde group and mns alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा