राज ठाकरे यांचे ‘खळ्ळखटॅक’ आंदोलन यशस्वी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरात मनसेकडून  मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या अवाजवी दरांतील खाद्यपदार्थ विक्रीला विरोध करीत ‘खळ्ळखटॅक स्टाईल’ मध्ये आंदोलन केले होते. राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचा थिएटरमधील लुटीविरोधात एल्गार केला होता. आता हे आंदोलन यशस्वी झाल्याचे चित्र आहे. या संदर्भांत हायकोर्टाकडून  कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे शेवटी या मल्टिप्लेक्स चालकांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राजा ठाकरे यांची त्यांचे निवास्थान कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर  मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाकडून या नऊ अटी मान्य करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97d16577-81e0-11e8-9257-938a54853fac’]

या अटी मान्य

  • चहा, कॉफी, पाण्याची बाटली, समोसा,पॉपकॉर्न आणि बटाटा वडा हे पदार्थ जे सर्वसाधारणपणे चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून खाल्ले जातात त्यांचे दर 50 रुपयांच्या आसपास ठेवले जातील
  • लहान मुलांसाठीचं अन्न, मधुमेही आणि हृदयरोगी ह्यांना आवश्यक अन्नपदार्थ चित्रपटगृहात आणण्यासाठी मज्जाव केला जाणारा नाही.
  • प्रेक्षकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी कोणाला संपर्क करावा याचा तपशील चित्रपटगृहात पडद्यावर दाखवला जाईल

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे दर अवाजवी असतातच, पण प्रेक्षकांना विकत न घेतलेल्या पदार्थांचे बिल आकारण्याचे प्रकार सर्रास आढळतात. चित्रपटगृहातील कर्मचारी वर्ग प्रेक्षकांशी उर्मटपणे वागतो ह्या तक्रारी देखील अनेकवेळा आल्या आहेत. मध्यंतराचा कालावधी इतका छोटा असतो, की झालेली फसवणूक प्रेक्षकाला चित्रपटगृह सोडल्यावर लक्षात येते आणि ह्यासंबंधी तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध नसतो. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीतानंतर पडद्यावर ह्यासंबंधीची तक्रार कुठे करावी ह्याचा तपशील दाखवावा जेणेकरून प्रेक्षक नडला जाणार नाही. असे मनसे कडून सांगण्यात आले. दरम्यान, वरील सर्व प्रमुख मुद्द्यांची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत झालेली असेल, याची खातरजमा मनसेकडून केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले  आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

संबधित बातमी

मल्टिप्लेक्स चालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला