संतापजनक : नागौरमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार, घटनेनंतर आरोपींनी प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बाटली

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या नागौरमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी दुष्कर्म केल्यानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली टाकली. धक्कादायक म्हणजे इतके राक्षसीकृत्य घडून देखील पोलिसांनी माणुसकी दाखवली नाही. पोलिसांनी घटनेची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानंतर केस दाखल करण्यात आली. सध्या आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

19 जानेवारीला घडली घटना
माहितीनुसार, ही घटना 19 जानेवारी 2021 ची आहे. या दरम्यान महिला शेजारच्या शेतात बनवलेल्या एका घरात गेली होती. तिला तेथून ताक घ्यायचे होते. यावेळी शेजारच्या शेतात काम करणार्‍या तिन तरूणांनी तिला पकडले.

आळीपाळीने केले दुष्कर्म
असे सांगितले जात आहे की, आरोपी पीडितेला शेतात ओढत घेऊन गेले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान महिला मदतीसाठी ओरडत होती, परंतु आरोपींनी तिला सोडले नाही. यानंतर त्यांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बाटली टाकली.

जीवे मारण्याची धमकी
पीडितेने सांगितले की, घटनेनंतर तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. कुणाला काही सांगितले तर तुला बरबाद करू अशीही धमकी या नराधमांनी पीडितेला दिली. आरोपींच्या या धमकीमुळे पीडितेचे कुटुंबिय घाबरलेले आहे.