पतीकडून अनैसर्गिक संबधासाठी जबरदस्ती अन् सासर्‍याने केले लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल

धौलपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  एका 24 वर्षीय महिलेने पती अनैसर्गिक अत्याचार करत असून, सासरा बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने पती आणि सासऱ्याविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली असता, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी पिडित महिलेने तक्रार दिली आहे. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पती जीवे मारण्याची धमकी देत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केला, असा आरोप महिलेने केला आहे. पीडितेने आपल्या सासऱ्यावरही आरोप केले आहेत. सासऱ्याने देखील जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर 15 दिवसांनी सासरची मंडळी हुंडा म्हणून 5 लाखांची मागणी करू लागले. पीडितेने आपल्या माहेरच्या लोकांना याबाबत सांगितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.