राजेश चव्हाण यांची संजय गांंधी निराधार अनुदान समितीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील नीरा येथील राजेश वसंतराव चव्हाण यांची पुरंदर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पञ नुकतेच पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी राजेश चव्हाण यांना दिले आहे.

राजेश चव्हाण यांची पुरंदर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी पुरंदरचे आमदार संजय जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंञी तथा पुण्याचे पालकमंञी अजित पवार यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी पुरंदर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीवर राजेश चव्हाण यांच्यासह तालुक्यातील दहा व्यक्तींची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश पुरंदरच्या तहसीलदारांना दिले होते.

त्यानुसार पुरंदरच्या तहसिलदारांनी अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. नीरा येथील राजेश चव्हाण हे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत. तसेच ते श्री. समर्थ सह. पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत. राजेश चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.