Rajesh Kshirsagar | ‘संजय राऊत आणि विनायक राऊत उद्धव ठाकरेंचे कानफुकरे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोनही राऊत कानफुकरे असून त्यांनी माझ्याबाबात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कान फुकले आहेत, असे आरोप राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले आहेत.

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, संजय राऊत म्हणतात, प्रत्येक पक्षात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असतात, त्याप्रमाणे प्रत्येक पक्षात संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यासारखे कानफुकरे पण असतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. यावर संजय राऊत किंवा विनायक राऊत यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा देखील समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर सध्या दोन गुन्हे दाखल आहेत. एक म्हणजे त्यांनी ठाण्यात हर हर महादेव (Har Har Mahadev Marathi Movie) चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले आणि भाजप महिला कार्यकर्त्या रीदा रशीद (Rida Rashid) यांनी त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या जुलमी राजवटीला कंटाळून राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यांच्यावर क्षीरसागर म्हणाले, जितेंद्र आव्हाड नाटक कंपनीतील एक कलाकार आहेत.
त्यांनी राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करावे. खोटे बोला, पण रेटून बोला, ही आव्हाडांची वृत्ती आहे.
तसेच काहीतरी बोलून चर्चेत राहायचे हा आव्हाडांचा उद्योग आहे. त्यामुळे आव्हाड त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :-  Rajesh Kshirsagar | sanjay raut vinayak blew uddhav thackeray ears about me says rajesh kshirsagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Arbaaz Khan | “सलमानचा भाऊ आणि मलायकाचा…” अनेक वर्षांनंतर अरबाज खानच्या ‘या’ वेदना ओसरल्या

Salaam Venky Movie| ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

Haryanvi Dancer Gori Nagori | हरियाणवी डान्सर गोरी नागोरीच्या ‘या’ गाण्यावरील डान्स पाहुन चाहते झाले घायाळ, सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल (VIDEO)