Rajesh Shah Pune | राजेश शहा यांना महेंद्रभाई स्मृती पुरस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajesh Shah Pune | सोलापूर येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणारा स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ पुण्याचे प्रसिद्ध समाजसेवक व व्यावसायिक राजेश शहा यांना संस्थेचे अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवार, २४ डिसेंबर रोजी सोलापूर येथील गुजराती भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी बोलताना ‘चांगली काम करत गेल्यास लोक एकमेकांशी जुळत जाऊन समूह तयार होतो. समूहाने मिळून काम केल्यास मोठमोठी कार्ये यशस्वी होतात’ असे प्रतिपादन राजेश शहा यांनी केले. ते पुढे बोलताना म्हणाले, समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे. ही वेळ समाजाला काहीतरी देण्याची आहे. गुजराती समाज एकत्र येणे आवश्यक आहे. त्यातून अनेक मोठी कार्य साकार होऊ शकतात. (Rajesh Shah Pune)

या कार्यक्रमास विश्वस्थ विजय पटेल, बिपीन पटेल, केशव रामभिया आदींसह संचालक संजय शाह, भरत शाह, जगदीश पटेल, संजय पटेल, गोविंद पटेल, नीलेश पटेल, हितेंद्र वोरा, महिला मंडळाच्या अध्यक्षा पारुल पटेल, युवा फोरमचेअध्यक्ष धर्मेश राडिया, केतन शाह, तरंग शाह, ज्योती शाह, प्रीती शाह, हिना गाला, इंदिरा पटेल, उमेश ऐनापुरे, दिलीप माने, सुभाष सुराणा उपस्थित होते. (Rajesh Shah Pune)

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपाध्यक्ष मणिकांत दंड यांनी स्वागत केले, तर सचिव जयेश पटेल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष मुकेश मेहता यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. खजिनदार चिमण पटेल, सहसचिव संदीप जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांची ओळख कौशिक शाह यांनी करून दिली. याप्रसंगी राजेश शहा यांच्या हस्ते गुजराती दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | भरधाव दुचाकीची कारला धडक, एकाचा मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

Skin Hydration | खाज येण्यापासून ते बारीक रेषांपर्यंत, त्वचेमध्ये पाणी कमी झाल्यास दिसतात ‘हे’ 5 चिन्हे..

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती