‘भाईजान’ सलमाननं रिलीज केलं रजनीकांतच्या दरबारचं ‘पोस्टर’, लिहीलं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘दरबार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. अभिनेता सलमान खान, मोहनलाल, महेश बाबू आणि अभिनेता कमल हासन या चार चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी रजनीकांत यांच्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले. सलमान खानने पोस्टर प्रदर्शित करुन लिहिले की, ‘एका सुपरस्टारला नाही तर एकमेव सुपरस्टारला शुभेच्छा..’

View this post on Instagram

Vanakkam! Vandhuten nu sollu!

A post shared by Rajinikanth (@rajinikanth) on

रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सुमारे 40 सेकंदांचे आहे. 68 वर्षांचे रजनीकांत 25 वर्षानंतर या सिनेमात पोलिसांच्या भूमिकेत परतले आहे. या चित्रपटातील रजनीकांत यांच्या व्यक्तिरेखेचे नाव आदित्य अरुणासलाम आहे. हा चित्रपट 15 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात नयनतारा, निवेता थॉमस, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर आणि योगी बाबूही दिसणार आहेत.

एआर मुरुगदास या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दरबार फिल्म Lyca प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात येत आहे. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळममध्ये रिलीज होईल. या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता सुनील शेट्टीनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. सुनील शेट्टीने लिहिले की, ‘थलायवा इज बैक’. या ड्रीम टीमचा भाग होणे हा एखाद्या सन्मानापेक्षा कमी नाही.’ हा खूप यशस्वी चित्रपट होणार आहे. रजनीकांत दिग्दर्शक शिवासोबत आणखी एका तमिळ प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत.
image.png
यापूर्वी रजनीकांत ‘पेट्टा’ चित्रपटात दिसले होते. ‘पेट्टा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलीच धमाल केली होती. 2018 मध्ये रजनीकांत यांचा ‘काला’ आणि ‘2.0’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचबरोबर सलमान खानचे देखील चित्रपट येत आहे ज्यामध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दबंग 3’ आणि ‘राधे’ मध्ये सलमान खान पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like