Rajkumar Santoshi | दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना 1 वर्षाची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) हे बॉलिवूडचं (Bollywood) मोठं नाव आहे. त्यांनी अंदाज अपना अपना (Andaz Apna Apna), घायल (Ghayal), दामिनी (Damini) आणि लज्जा (Lajja) सारखे सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. मात्र सध्या राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशी ओळख असणाऱ्या संतोषी यांना कोर्टाने (Court) 1 वर्षे कारावास आणि 22.5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली (Sentenced) आहे. संतोषी हे वेगवेगळ्या प्रकरणात दोषी आढळल्याने (Found Guilty) न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. याशिवाय लाखो रुपयांच्या धनादेशाची रक्कम दोन महिन्यांत भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. संतोषी यांनी दोन महिन्यात पैसे दिले नाही तर त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावं लागेल.

 

काय आहे प्रकरण ?
राजकोटचे (Rajkot) तक्रारदार अनिल जेठानी (Anil Jethani) यांच्यासोबत चांगले संबंध असल्याने राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांनी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. या व्यवहारादरम्यान संतोषी यांनी जेठानी यांना 22.50 लाखांचे तीन वेगवेगळे धनादेश दिले होते. परंतु हे तिन्ही धनादेश बाऊन्स (Check Bounce) झाल्याने जेठानी यांनी संतोषी यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली होती. मात्र, संतोषी यांनी नोटीसला उत्तर न दिल्याने कलम 138 अंतर्गत त्यांच्याविरोधात 17.5 लाख आणि 5 लाख रुपयांसाठी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या. राजकुमार संतोषी यांनी 2 महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम न भरल्यास त्यांना आणखी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.

 

संतोषी यांच्यावर दाखल असलेल्या दोन्ही प्रकरणांची सुनावणी राजकोटच्या अतिरिक्त मुख्य न्यायमूर्तींसमोर (Additional Chief Justices) झाली.
राजकुमार संतोषी यांनी दावा केला की त्यांनी पैसे परत केले असताना त्यांच्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करण्यात आला आणि कोणताही व्यवहार प्रलंबित नाही.
यानंतर न्यायालयाने बँक अधिकाऱ्यांना साक्षीसाठी बोलावले आणि त्यांनी तक्रारदार यांची बाजू घेतली.

राजकुमार संतोषी म्हणाले, ते सेलिब्रिटी असल्याची भरपाई देत आहे. सेलिब्रिटी असल्याचे नुकसान मी भोगत आहे.
आम्ही सोपे लक्ष्य आहोत. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही याप्रकरणी अपील करु. मला आशा आहे की न्याय नक्की मिळेल.

 

राजकुमार संतोषी यांचे गाजलेले चित्रपट
घायल, पुकार, अंदाज अपना अपना, दामिनी, द लेजेंड ऑफ भगत सिंग (The Legend of Bhagat Singh), खाकी (Khaki), अजब प्रेम की गजब कहानी (Ajab Prem ki Ghazab Kahani) हे चित्रपट गाजले.
संतोषी यांचा ‘अंदाज अपना अपना 2’ बनवण्याची योजना होती.
मात्र या प्रकरणामुळे मार्गात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Rajkumar Santoshi | filmmaker rajkumar santoshi found guilty in two cases has been sentenced to one year

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा