Chitra Wagh-Satej Patil | चित्रा वाघ यांचा सतेज पाटलांना सवाल; म्हणाल्या – ‘मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh-Satej Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kolhapur Assembly By-Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची सभा रविवारी रात्री आयोजित केली होती. ही सभा सुरु असताना व्यासपीठाच्या मागील बाजूस दोघा अज्ञातांनी व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली होती. या घटनेवर चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडणे लाजीरवाणे असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर कोल्हापुरचे पालकमंंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर पुन्हा चित्रा वाघ यांंनी पलटवार केला आहे. (Chitra Wagh-Satej Patil)

चित्रा वाघ बोलताना म्हणाल्या की, ”मी तुमच्या बायकोवर बोलत नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता ? त्यांचा या राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्या नवऱ्याची एक गोष्ट बाहेर काढा, मी राजकारणातून बाहेर पडेन, असे आव्हान चित्रा वाघ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले आहे.” चित्रा वाघ या आज (सोमवारी) माध्यमांशी बोलत होत्या. (Chitra Wagh-Satej Patil)

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ”जेव्हा राजकारणात कोणते मुद्दे चर्चेला मिळत नाहीत. तेव्हा वैयक्तिक मुद्यावर बोललं जातं. बंटी पाटील हेच करत आहेत. तुम्ही कोल्हापूरचे पालक आहात, मालक नाही. अनेक महिलांवर अत्याचार आणि बलात्कार होत आहे. या महिलांच्या अत्याचारावर गृहराज्यमंत्र्यांनी बोलावं,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Chitra Wagh ,Satej Patil | BJP leader chitra wagh challenge to satej patel kolhapur by elections


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dilip Walse Patil On BJP Leader | ‘भाजपवाले सगळेच धुतल्या तांदळासारखे आहेत का?’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

BJP vs NCP | राज ठाकरेंना ‘सरडा’ म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला भाजपचं उत्तर; म्हणाले – ‘पहाटे शपथविधी झाल्यानंतर पवारांनी त्याच पुतण्याला…’

Amol Kolhe-Ajit Pawar | अजित पवारांसोबतचा ‘तो’ फोटो घेणाऱ्या युवा फोटोग्राफरचं कोल्हेंनी केलं खास कौतुक !

Benefits OF Honey And Nutmeg | जाणून घ्या मध आणि जायफळ एकत्र खाण्याचे अनेक फायदे

Girish Bapat On Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर (Fast Track) सुरू करा – खासदार गिरीश बापट