Rajnath Singh Pune Visit | संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबनाची गरज’ राजनाथ सिंह यांची DIAT मध्ये विद्यार्थ्यांना साद (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajnath Singh Pune Visit | संरक्षण क्षेत्र हे अस्वच्छ थांबणारे तलाव नसून वाहणारी नदी आहे. नदी ही सतत वाहत असते व येणाऱ्या अडथळ्यांना पार करत असते. म्हणूनच आपण अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्यात यशस्वी होत आहोत. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वालंबनाची गरज असून संरक्षण मंत्रालय त्यासाठी प्रयत्नशील आहे असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुण्यामध्ये (Rajnath Singh Pune Visit) मांडले. ते पुणे येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डाएट) Defence Institute of Advanced Technology (DIAT) च्या १२ व्या दीक्षांत समारंभास (Convocation) उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते २६१ एमटेक / एमएससी सह २८३ विद्यध्यांना पदवी प्रदान तसेच विविध विषयांतील पीएच.डी. विद्यार्थ्यांसह एकूण २० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात आली. (Rajnath Singh Pune Visit)

येत्या काळात प्रतिस्पर्धी असलेल्या देशांकडे असलेले प्रगत तंत्रज्ञान (Advanced Technology) आपल्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. बदलल्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे वेगाने वाटचाल करण्याची गरज ओळखूनच डाएट सारख्या संशोधन संस्थांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सायबर (Cyber) व अंतराळातून (Space) होणाऱ्या संभाव्य हल्ल्यास तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान वेगाने विकसित करण्याची गरज असल्याचे मत संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले.

 

 

 

संरक्षण उपकरणात देशाचे असणारे परावलंबन (Dependency) आपल्या देशाच्या स्वायत्ततेमध्ये अडथळा निर्माण करू शकते यावर संरक्षणमंत्र्यांनी प्रकाश टाकला. या मुख्य कारणांसाठी पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार आत्मनिर्भरतेवर अधिक जोर देत कार्यरत आहे आणि सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत अलिकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. या निर्यातीत २०१४ मधील ९०० कोटी रुपयांवरून २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात १६,००० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. भारत (India) अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. अनेक देशांनी भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजनाथ सिंह म्हणाले की, सायबर आणि अंतराळाशी संबंधित नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या आव्हांनाना तोंड देण्यासाठी देशाला पूर्णपणे सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करण्याचा आणि प्रगती साध्य करण्याची गरज असल्याचे संशोधन संस्थांना सांगितले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत इतर देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची माहिती राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, युद्धाचे डावपेच अतिशय वेगाने निर्माण होत आहेत आणि त्यामुळे सध्या जगाला अनुभव
येत असलेल्या नॉन-कायनेटिक आणि संपर्करहित युद्धांना तोंड देण्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच अत्याधुनिक
तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होणे गरजेचे आहे असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी मांडले. (Rajnath Singh Pune Visit)

Web Title :-  Rajnath Singh Pune Visit | minister of defence rajnath singh was talking about the new challenges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)