Raju Shetty | सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मगाणारा हॉटेलवाला माझा कार्यकर्ता; राजू शेट्टींचा खुलासा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना रस्त्यात आडवून एका हॉटेल मालकाने (Hotelier) जूनी उधारी (Borrowed) मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला. 2014 पासून उधारी दिली नसल्याने हॉटेल मालकाने सादाभाऊ खोत यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर खोत यांनी पत्रकार परिषद घेत त्या हॉटेल मालकावर आरोप केले. दरम्यान या सर्व प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी खुलासा केला आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले.

 

सदाभाऊंकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे (Ashok Shingare) हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2014) त्याने आम्हाला साथ दिल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली.

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील एका हॉटेल मालकाने गुरुवारी (दि.16) सदाभाऊ खोत यांना अडवून 2014 पासूनची उधारी मागितली होती. त्यावर खोत यांनी, मी याची कसलीच उधारी केलेली नाही आणि अशोक शिनगारे याला आपण ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला पाठवून हा स्टंट केल्याचा आरोप खोत यांनी केला होता.

 

यानंतर राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिनगारे हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील (Swabhimani Shetkari Sanghatana) सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनात सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. परंतु पूर्वी होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

 

उधारी मिळेपर्यत सदाभाऊंना आडवणार – अशोक शिनगारे

अशोक शिनगारे यांनी सांगितले की, पैसे बुडवायचे म्हणून राष्ट्रवादीचे नाव सदाभाऊ घेत आहेत. परंतु मी राष्ट्रावादीचा नाही तर रघुनाथ दादा पाटील (Raghunath Dada Patil) यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे अशोक शिनगारे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

 

माझा आणि राष्ट्रवादीचा कहाही संबध नाही. माझ्यावर गुन्हेगारी केससंदर्भात खोत हे खोटी माहिती देत आहे.
मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नाही. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे.
मात्र सदाभाऊंनी माझ्या हॉटेलची आठ वर्षापूर्वीची उधारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
तसेच सदाभाऊ खोटी माहिती देऊन पैसे बुडवायच्या तयारीत असले तरी मी पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही,
ते ज्यावेळी येतील त्यावेळी गाड्या अडवणार असल्याचे शिनगारे यांनी सांगितले.

 

Web Title :- Raju Shetty | raju shetty says my old polictical worker hotelier who borrowed from sadabhau khot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा