Raju Srivastava | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Raju Srivastava | प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना प्रथम इमर्जन्सी मेडिसिन विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. नंतर सीसीयू (कार्डियाक केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले. (Raju Srivastava)

 

उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव (58 वर्षे) यांना ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. (Raju Srivastava)

 

राजू यांना व्हेंटिलेटरवर ठेवले

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात 100 टक्के ब्लॉक आढळला आहे.
सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी मेडिसिन विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना रिकव्हर केले होते.
यानंतर त्यांना कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजू यांचे पीआरओ अजित यांनी सांगितले की, कॉमेडियन राजू श्रीवास्तव पक्षाच्या काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.
ते सकाळी जिमला गेले, जिम करत असताना त्यांना कार्डियक अरेस्ट आला.

 

टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा

राजू श्रीवास्तव अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग आहेत. ते नेहमीच प्रेक्षकांना हसताना दिसले आहे. राजू श्रीवास्तव यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांमध्ये केली जाते.
राजू श्रीवास्तव ’बिग बॉस’, ’शक्तिमान’, ’द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ’कॉमेडी सर्कस’ आणि ’द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसले आहेत.
याशिवाय राजू श्रीवास्तव इतर अनेक शोमध्ये दिसले आहेत.
त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते प्रचंड तणावाखाली आले आहेत.
तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

 

 

Web Title : – Raju Srivastava | raju srivastava health critical kept ventilator support aiims

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा