महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे. विरोधी पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी महाभियोगाचा प्रस्ताव दिला होता. उपराष्ट्रपतींच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

काँग्रेससह सात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरन्यायाधीशांविरोधांत शुक्रवारी पदाचा दुरुपयोग व अन्य आरोपांतर्गत महाभियोग प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर ७१ खासदारांनी सह्या केल्या होत्या. मात्र, त्यातील सात खासदार हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. या आधारावर उपराष्ट्रपतींनी हा प्रस्ताव फेटाळला असल्याची चर्चा आहे. रविवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली होती. यानानंतरच हा निर्णय सकाळी उपराष्ट्रपतींनी फेटाळला.

भारतात आतापर्यंत सरन्यायाधीशांविरोधात कधीही महाभियोगाचा प्रस्ताव दाखल झाला नव्हता. या प्रस्तावाकडे त्यामुळे देशभरातील कायदेतज्ञांचे लक्ष लागले होते. महाभियोग प्रस्तावाच्या मुद्यावर विरोधी पक्षातही फूट दिसली. या प्रस्तावापासून काही विरोधी पक्षांनी फारकत घेतली होती. या प्रस्तावावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील स्वाक्षरी केली नव्हती.

संबंधित घडामोडी:

सरन्यायाधीशांच्या विरोधात काँग्रेससह महाभियोगाची नोटीस

महाभियोगाच्या नोटीसीवर मनमोहन सिंहांची स्वाक्षरी नाही