Rajya Sabha Election 2022 | ‘राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार’ – गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीवरुन (Rajya Sabha Election 2022) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सहाव्या जागेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) आमने सामने आले आहेत. शिवसेनेकडून संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपकडून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे. आपआपला उमेदवार विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली कंबर कसली आहे. घोडेबाजार होऊ नये यासाठी आमदारांना लपवा छपवीचे डाव सुरू आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी भाजपच्या उमेदवारीवरून मोठं विधान केलं आहे.

 

गिरीश महाजन म्हणाले की, “राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरले आहेत. त्यामुळे हॉटेल टू हॉटेल त्यांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. आमची रणनीती पक्की झाली असून कोणत्याही परिस्थितीत आमचे धनंजय महाडिक विजयी होणार आहेत. राज्यसभेचा गुलाल कोल्हापूरच्या महाडिकांना लागणार हे आपण खात्रीशीर सांगत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.”

पुढे बोलताना महाजन म्हणाले, “लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत.
आमच्याकडे तिसरा उमेदवार जिंकण्या इतके पुरेसे संख्याबळ आहे.
त्यामुळे तिसरा उमेदवार विजयी होणारच हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो.”
तसेच, ‘शिवसेनेचे आमदाराच पक्षावर नाराज आहेत.
ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करत आहे.
घटक पक्षातील बच्चू कडू (Bachchu Kadu), अबू आझमी (Abu Azmi) नाराज आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे.
त्यांना आपल्याच आमदारांवर भरोसा राहिलेला नाही त्यामुळे आमचा विजय निश्चित असून राज्यांतील बदलाची ही नांदी असेल,” असं ते म्हणाले.

 

Advt.

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | bjp leader and former maharashtra minister girish mahajan says rajya sabha election 2022 win by dhananjay mahadik kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा