Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्डधारकांसाठी (Aadhaar Card) एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि तुमच्या घरातील गॅस सिलिंडरपासून ते बँकेपर्यंत सर्व काही आधारशी जोडलेले आहे, ज्यामुळे ग्राहकांना अनेक मोठे फायदे मिळतात, परंतु काहीवेळा फसवणूक देखील होते. (Aadhaar Card)

 

अशावेळी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी काळजी घ्यावी. जर कोणी तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील किंवा ओटीपी विचारत असेल तर सतर्क व्हा. यूआयडीएआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

 

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटवर लिहिले आहे की, तुम्ही तुमचा आधार ओटीपी कधीही कोणाशीही शेअर करू नका. यासोबतच तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.

 

UIDAI ने सांगितले की, ओटीपी मागण्यासाठी किंवा तपशील विचारण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून कधीही कॉल किंवा एसएमएस येणार नाही.

 

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये खूप वाढ होत आहे, त्यामुळे अशा फोन कॉल्स आणि एसएमएसपासून सावध रहा.

 

गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सायबर गुन्हेगारांनी लोकांचा आधार कार्ड डेटा चोरला आणि त्याचा कर्जासाठी किंवा फसवणुकीसाठी वापर केला.

 

अशावेळी, आधार कार्ड हिस्ट्री (Aadhaar Card History) वेळोवेळी तपासत राहणे खूप महत्वाचे आहे.
हिस्ट्री तपासून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे जाणून घ्या.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card download aadhaar card frauds uidai update uidai website

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN Card New Rule | घरबसल्या करता येणार PAN कार्डमध्ये बदल; नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या

 

UPI Payments Without Internet | विना इंटरनेट सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट, जाणून घ्या सोपी पद्धत

 

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार

 

Gopichand Padalkar On Thackeray Government | गोपीचंद पडळकरांचा आरोप; म्हणाले – ‘ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र’

 

PM Suraksha Bima Yojana-PMSBY | PM सुरक्षा विमा योजनेच्या नियमात बदल; प्रीमियम तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या