Rajya Sabha Elections 2022 | महाविकास आघाडीला मोठा धक्का ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना मतदानासाठी न्यायालयाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha Elections 2022 | राज्यसभा निवडणूकीच्या (Rajya Sabha Elections 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंत तापलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरत्या जामीनासाठी दाखल केलेल्या याचिका मुंबई न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) फेटाळण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) एक मोठा धक्का बसला आहे.

 

 

राज्यसभा निवडणूक मतदानासाठी एक दिवसाचा जामीन मागणारी अनिल देशमुख, नवाब मलिक यांची याचिका फेटाळली आहे. या निर्णयाने मुंबई न्यायालयाने आघाडी सरकारला झटका दिला आहे. त्यामुळे आता सरकार मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे.

 

 

उद्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने 6 वा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीत जाण्याचा मार्ग अडखळला आहे.

 

Web Title :- Rajya Sabha Elections 2022 | Mumbai Court rejects pleas filed by
Maharashtra Cabinet Minister Nawab Malik and former Home Minister Anil Deshmukh seeking temporary bail of a dah to cast vote in Rajya Sabha elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा