Pune Municipal Corporation (PMC) | पुणेकरांना आता रस्त्यावर वाहन उभे करून शाॅपिंग करणं पडणार महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | पुणेकरांसाठी (Pune News) आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील रस्त्याच्या कडेचे विविध स्टॉल आणि रस्त्यावर बसणारे भाजी विक्रते यांच्यापुढे दुचाकी उभी केल्यास पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे टू – व्हीलरवर (Two-Wheeler) बसून होणारी खरेदी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमोर टू – व्हीलर लावून होणारी खाद्यंती यापुढे चांगलेच महागात पडणार आहे. (Pune Police)

 

भाजी, किरकोळ खरेदी अथवा खाण्यासाठी गाडी रस्त्यावर लावल्यास किंवा गाडीवर बसून अशी खरेदी केल्यास 2 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहतुकीला शिस्त (Pune Traffic) लागेल आणि वाहतूक कोंडी टाळता येईल, असा दावा महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून आयुक्त कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

पुणे शहरातील बहुतांश रस्त्यांवरील पदपथांवर खाद्यपदार्थ, किरकोळ साहित्य विक्री, भाजी विक्री केली जातेय.
तेथे खरेदी करण्यासाठी खाद्यपदार्थ, भाजी विक्रीचे स्टॉल, पथारींपुढेच टू – व्हीलर त्याचबरोबर फोरव्हिलर वाहने लावली जातात.
त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
त्यामुळे रस्त्यावर उभ्या करण्यात येणा-या वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय अतिक्रमण निमूर्लन विभागाकडून घेण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | pune police to take action on those who park vehicles road side for window shopping pmc news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा