Rajya Sabha | PM मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्री ‘बांगलादेशी’, तृणमूल काँग्रेसचा आरोप, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत (Rajya Sabha) आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत गदारोळ माजला होता. अधिवेशनादरम्यान उठलेल्या विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब झालं. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक आक्रमक झाले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदाराकडून मोदी सरकारवर (Modi government) जोरदार आरोप करण्यात आला. यावरून राज्यसभेत (Rajya Sabha) गदारोळ निर्माण झाला होता.

Rajya Sabha | uproar in rajya sabha as opposition asks govt to clarify on nationality of newly inducted minister

अधिवेशन दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री बांगलादेशी असल्याचा मोठा आरोप तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदाराने केला आहे. तसेच, या प्रकरणी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी देखील करण्यात आली आहे. या विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सकाळी 2 वेळा तहकूब करावं लागलं. दुपारी 3 वाजता कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सुखेंदू शेखर रॉय (Sukhendu Shekhar Roy) यांनी नियमांचं कारण देत केंद्रातील मोदी सरकारवर (Modi government) गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) सभागृहात ज्या नवीन मंत्र्यांची यादी सादर केली केली आहे, त्यामधील एक राज्यमंत्री बांगलादेशी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण एक सूचना सभागृहात मांडलीय. मंत्री बांगलादेशी आहे की नाही? हे जाणून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचं राज्यसभेचे विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या या आरोपावरून त्याचा तीव्र विरोध भाजपच्या खासदारांनी केला आहे. राज्यसभेचे नेते
तथा मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी विरोधकाचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे
असल्याचा दावा केला आहे. अधिवेशनादरम्यान राज्यसभेत जे निराधार आरोप केले जात आहेत,
त्याचा तीव्र निषेध करतो. यात कुठल्याही तथ्य नाही. समाजातील एका विशिष्ट वर्गाला अपमान
विरोधकांनी केला आहे, असा आरोप पियुष गोयल यांनी केला आहे. दरम्यान, विरोधकांनी उपस्थित
केलेल्या मुद्दा सभागृह उपाध्यक्षांनी कामकाजातून वगळवा, अशी मागणी देखील गोयल यांनी
त्यावेळी केलीय. तर, हे तपासले जाईल, असं उपाध्यक्ष हरिवंश यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Rajya Sabha | uproar in rajya sabha as opposition asks govt to clarify on nationality of newly inducted minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update